मंगलवार, अक्टूबर 19, 2021
Home > इतिहास > भारतीय इतिहास खरोखर सत्य आहे का ?

भारतीय इतिहास खरोखर सत्य आहे का ?

हा विषय माझ्या मनात तेव्हां जन्मास आला ज्या वेळी मी लोकांकडून विशेषत: शिकलेल्या लोकांकडून हे ऐकलं कि, भारतीय लोक अजिबात ऐतिहासिक नाहित।

असं का आहे की आपण भारतीय, जगातील सर्वात अद्वितीय लोकं आहोत? कारण – आपण आपल्या इतिहासाबद्दल अजिबात विचार करत नाहित. खरोखरच आपल्याला जगातील सर्वात जुनी आणि सतत चालत आलेली संस्कृति लाभलेली आहे का ?  हा निश्चितपणे एक आश्चर्यकारक आरोप आहे।

इथे लोकं रोजच्या संभाषणातही आपल्या भावना, दुसर्यांच्या नावांना आणि लौह युगापासून महाकाव्यांमध्ये चालत आलेल्या वाक्यांचा वापर करत असतात. दर दिवशी लाखो हिन्दू अगदी कांस्य युगात वैदिक संस्कृति च्या प्राचीन रुपात घडवलं गेलेल्या गायत्री मंत्राचा उच्चार करत असतात जे अगदी  3500 से 5000 वर्षांपासुन चालत आलेले आहेत.  अणि तुम्ही कुणालाही हे विचारलं तर ते हे सांगणार.  यावरून हे स्पष्ट होते की, आपण आपल्या भूतकाळात राहतो, आपल्या सतत चालत आलेल्या संस्कृतीत राहतो. ही सातत्यता, आपण आज जिच्याबद्दल बोलणार आहोत, आपल्या रक्तातच आहे।

म्हणून निश्चितपणे आपण आरोपी आहोत कि, आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल अजिबात आपुलकी नाही, आणि ज़र आपल्यात ती आपुलकी नाही, तर माझी आणि आपली या ठिकाणी असण्याची अजिबात लायकी नहीं. मग, मुख्य समस्या आहे काय? मी तर हे म्हणेन कि, जे ज्ञान आपल्याला आपसुकच मिळालेले आहे, आणि जे आपल्या पुस्तकातून आपल्याला मिळालेले आहे, ते पूर्णत: खोटे आहे।

आणि आपल्याला आपसुक ज्ञानाने हे माहीत आहे कि, हे खोटे आहे तर आपण त्याचा मान राखु शकत नाही. तर खरोखर समस्या ही आहे कि, यात किती प्रमाणात खोटे आहे आणि किती खरे सांगितले जात आहे.  आणि दूसरा मुद्दा हा आहे कि, ज़र हे सर्व सत्य आहे, तर आपण कसे हे लोकांना योग्य प्रकारे सांगणे सुरु करावे?

ब-याच कारणाने, आज जो काही इतिहास आपल्या समोर ठेवलेला आहे तो क्षत विक्षत इतिहास आहे. आणि आज त्यातली थोड़ीच कारणं मी आपल्या समोर ठेवणार आहे, कारण सगळी कारणं सांगायला बराच वेळ लागेल।

पण, हे फार-फार महत्वाच्या कारणामधून एक आहे कि, आपल्या महत्वपूर्ण इतिहासाला मूलतः सदोष करून आपल्या समोर का ठेवले गेले आहे, कारण, हा आपला आपला इतिहास अजिबात नाही. हा परदेशी आक्रमण करणार्यांचा इतिहास आहे, त्यांच्या आक्रमणाचा इतिहास आहे जो त्यानीच लिहिलेला आहे।

आणि म्हणून, आपण ज़र भारतीय इतिहास वाचला असेल, त्यात अशा युद्धांची एक लाम्ब यादी असेल ज्यात आपण हरलेलो आहोत, तर, तुम्ही आपल्या कॉलेजात, शाळेत पुस्तकांमधुन जो इतिहास वाचलेला आहे, परत पुन: त्याबद्दल विचार करा. यात पानिपतची तीन युद्धं आहेत, प्लासिची लढाई आहे आणि बक्सरचे युद्ध पण आहे।

पण आपण त्या युद्धांबद्दल कधीच वाचलेले नाही ज्यात भारताला विजय मिळालेले आहे. आणि खरोखरच ज़र आपण आपल्या इतिहासाची पुस्तकं चाळली तर आपण बघू कि भारताने बरीच युद्धे जिंकली आहेत. याचे एक साधे कारण हे आहे कि आपण आत्ताही या भुमीवरती आहोत. आणि आपण आपलं भरपूर रक्त गाळलेलं आहे आणि म्हणून आपण इथे सातत्याने  राहत आहोत. याची कारणं ही नाहीत की, परकियांनी आपल्यावर आक्रमणं केली नाहित किंवा हे ही नाहित कि त्यांनी आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला नाही।

Leave a Reply

Sarayu trust is now on Telegram.
#SangamTalks Updates, Videos and more.

Powered by
%d bloggers like this: