आता अयोध्येतील वादा बद्दल बोलूया. आपण फार भाग्यवान आहोत की अयोध्या प्रकरणी 1822 पासूनचा वाद जिल्हा न्यायालयात नोंदवलेला आहे. जिल्हा न्यायालयात पहिला पुरावा एक नोट आहे जो न्यायालयाच्या अधिकारी हाफीझुल्ला याने सादर केला होता. त्यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात एक नोट सादर केले ज्यात ते म्हणतात की बाबरी मस्जिद राम मंदिर नष्ट केल्यानंतर आणि सीता कि रसोईच्या पुढे बांधलेली आहे. तर, यामध्ये राम मंदिरांचा आणि सीता की रसोईचा ही उल्लेख आहे.
फैजाबाद हायकोर्टात न्यायालयीन अधिकार्याने ही नोट पाठविल्याचे सांगितले आहे. आता, 1855 मध्ये काहीतरी फार मनोरंजक घडते. ब्रिटीश रेसिडेंटनी अवध नवाबला एक पत्र लिहिलं कारण नवाब अद्याप आहे; त्याला अद्याप सिंहासनावरुन काढलेले नाही. ते 1857 च्या उठाव झाल्यानंतरच घडले. म्हणून, त्यांनी अवधच्या नवाबला लिहिलेले आहे की, सुन्नी नेते गुलाम घुसैन आहेत आणि त्यांनी एक सैन्य गोळा केल आहे आणि तो हनुमान गढीवर हल्ला करण्याची योजना आखत आहे आणि त्यांनी अवध च्या नवाबला सांगितलं की कृपया त्याला थांबवा, काही शिपायांना पाठवा आणि हनुमान गढीवरील हल्ला थांबवा. नवाब काही करत नाही आणि एक लहानसा लढा लागतो.
मग जुलैमध्ये आणखी एक गंभीर चकमकी घडते. गुलाम हुसैन आणि त्यांचे गट, हनुमानगढी वर हल्ला करतात. हनुमानगढी चे हिंदू हल्ले रोखण्यासाठी लढतात आणि त्या हल्ल्यात 70 मुस्लीम मारले जातात. आता मुसलमानांनी हनुमान गढीवर हल्ला का केला? ते म्हणतात की आत मशिद आहे, हनुमान गढीत एक मशिद आहे. हनुमान गढीच्या आत एक मशिद आहे आणि आपल्याला हनुमानगढी दिली पाहिजे. तर, ही दुसरी लढाई आहे ज्यात 70 मुस्लिम मारले जातात. यानंतर ब्रिटीश रेसिडेंटने अवध नवाबकडे दोन बाँडस पाठवले. आता, या दोन बाँडस त्यांनी मिळवले ते बाँडस बैरागी यांच्याकडून मिळवले होते, ज्यांचे हनुमान गढ़ी वर नियंत्रण होते.
पहिल्या बाँडमध्ये बैरागी म्हणतात की मुसलमानांबरोबर आमचा दुश्मनी नाही, आम्हाला त्यांच्याबद्दलची मैत्रीची भावना आहे आणि आमच्यावर आक्रमण झालं तरी आम्ही त्यांच्या बरोबर तश्याच पद्धतीने वागू, जसे आम्ही आज पर्यंत वागलो. दुस-या बाँडमध्ये ते म्हणतात की स्वतंत्र चौकशी केल्यास हनुमान गढीच्या आत मशिद असल्याचा दाखला येईल, तर आम्ही ताबडतोब संपूर्ण परिसर त्यांना त्यांच्या हाती सोपवू आणि लढणार नाही. मग ते अवधच्या नवाब ला म्हणतात की, आपल्या पूर्वजांनी आम्हाला हनुमानगढीत जमीन दिली होती परंतु इथे जर एखादा मशिद असती तर त्याने ते दिले नसते आणि त्यांनी कधीच मशिद नसल्याचे सांगितले आणि त्यानी पूर्वीच्या नवाबांनी दिलेले दस्तऐवजच्या क्रमवार प्रती पण जोडल्या.
त्यामुळे आता अवधच्या नवाबला काय करायचे आहे हे सुचेना. म्हणून ते म्हणतात, एक तडजोड करा आणि तडजोड म्हणजे आपण हनुमान गढीच्या पुढे मशिद बांधा. म्हणूनच हनुमान गढीच्या महंत म्हणतात की हे आम्हाला स्वीकार्य नाही आणि एक स्वतंत्र समितीची स्थापना झाली होती, ती निष्कर्षापर्यंत आली की हनुमान गढ़ीमध्ये कधीच मशिद कधीच नव्हती. आता जेव्हा स्वतंत्र समितीची ही बातमी जाहीर केली तेव्हा जिहादी अतिशय संतप्त झाले आणि एक नवीन नेता समोर आला – अमीर अली. हनुमान गढीवर हल्ला करण्यासाठी त्यानी एक मोठे सैन्य गोळा केलं. ब्रिटिशांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी नाही ऐकलं. त्यामुळे, अयोध्येवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्याला मारले. तर, 1855 मध्ये झालेला अयोध्या शहराचा हा पहिला सशस्त्र संघर्ष आहे.