शुक्रवार, सप्टेंबर 20, 2019
Home > अयोध्या राम मंदिर > पुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते?

पुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते?

बाबर मस्जिदच्या खाली असलेल्या एका प्राचीन मंदिराच्या उपस्थितीबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि विद्वानांनी पुरविलेले बरेच पुरावे असूनही, वामपंथी इतिहासकारांनी त्या पुराव्यांच्या अस्तित्वालाच स्वीकारण्यास नकार दिला होता. ह्या विवादाचा निराकरण होत नसल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शेवटी बाबरी मशिदीच्या खाली एक मंदिर आहे का हे पाहण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला उत्खनन करायला सांगितले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एएसआय ला  कडक निर्देश दिले होते  कि बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी आणि राम जनमभूमी संघटनेतील प्रत्येक प्रतिनिधीने दररोज उत्खनन स्थळावर उपस्थित असणे आवश्यक आहे आणि जे काही निष्कर्ष तयार होतील ते एका रजिस्टरमध्ये योग्यरित्या नोंदले पाहिजे ज्यावर दररोज दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केली पाहिजे.

एएसआयने अलाहाबाद उच्च न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांनुसार उत्खनन पूर्ण केले. एएसआय उत्खननांच्या निष्कर्षांनी दिसून आले की ई.पू. दोन सहस्त्र वर्षा पासून राम जन्मभूमिवर सतत वास्तव्य असून हे स्थान नेहमीच एक पवित्र स्थळ होते आणि कधीच राहणी साठी वापरले जात नव्हते.

ई.पू. पहिल्या सहस्राब्द पासून, २ ते १ शताब्दी ई.पू. शुंग कालखंड, १ ते ३ शताब्दी मधील कुशाण कालखंड, आणि ४ ते ६ व्या शतकात गुप्त कालावधीच्या आगमनानंतर च्या वास्तव्यासकट, एएसआयला गुप्त काळापश्चातचे विटांचे गोलाकार देवस्थळ पण सापडले . हे पूजास्थळ एक प्रकारचे शिवलिंग होते असे मानले गेले होते आणि त्या ठिकाणी ज्यामधून पाणी बाहेर पडत होती ती प्रणाली अजूनही अस्तित्वात आहे.

१० व्या ते ११ व्या शतकाच्या सुरुवातीच्या मध्ययुगाच्या काळातल्या, सुमारे ५० मीटर उत्तर-दक्षिण दिशेमध्ये एक प्रचंड संरचनेचे अवशेष त्यांना सापडले. एएसआयच्या मते, हे मंदिर फार काळ टिकले नव्हते कारण ते फारच कमी काळात नष्ट केले गेले. शक्य आहे कि जसे सोमनाथ मंदिर वारंवार उध्वस्त केले गेले  तसेच हे ही मंदिर केले गेले असणार. १० व्या ते ११ व्या शतकात बांधलेले  हे मंदिर उध्वस्त केले गेले असेल का? हे नक्कीच शक्य आहे कारण या सुमारास ह्या क्षेत्रात तुर्क सक्रिय होते.

मग, १० व्या ते ११ व्या शतकातील मंदिराच्या अवशेषांवर १२ व्या शतकात तीन टप्प्यांत, ५० मीटर उत्तर-दक्षिण आणि ३० मीटर पूर्व-पश्चिम दिशांमध्ये, तीन मजले आणि पन्नास खांबाचे एक प्रचंड मंदिर बांधले गेले. १६ व्या शतकापर्यंत हे प्रचंड मंदिर टिकून राहिले आणि मग ह्या मंदिराचे विध्वंस करून त्यावर बाबरी मशिद बांधण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे बाबरी मस्जिदची पायाभरणी कधीच केली गेली नव्हती आणि ह्या प्रचंड मंदिराच्या भिंतींच्या वरच मशीद बांधली गेली होती.

मराठी भाषांतरण – अभिजीत अधिकारी 

Leave a Reply

%d bloggers like this: