भारतीय लोकांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे की, जनपद केवळ बौद्ध काळातच अस्तित्त्वात होते, वैदिक कालखंडात नव्हे, कारण वेदांमध्ये त्यांचा संदर्भ दिसत नाही. वेदांमध्येच नमूद केलेल्या अंतर्गत पुराव्याला सादर करून श्री. मृगेंद्र विनोद हे, हा गैरसमज दूर करतात
श्री. मृगेंद्र यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या शतापथ ब्राह्मणांतील अनेक संदर्भ उद्धृत केले आहेत, ज्यात त्यांनी वैदिक काळातील अनेक साम्राज्य आणि जनपदांची नावे दाखवलेली आहेत. कुरुक्षेत्राला केंद्र ठेवून, पूर्व दिशेला कुरु आणि पांचाळ आहे. गंगा आणि यमुना दरम्यानच्या प्रदेशात कुरु आणि पूर्वेला गंगेच्या पलीकडे पांचाळ आहे. उत्तरेकडे श्रीन्जय आणि दक्षिणेला मत्स्य आहे. गांधार, कैकय आणि माद्र हे उत्तर जनपद आहेत, तर कोशल, विदेह आणि काशी पूर्वी जनपद आहेत.
कृष्ण यजुर्वेदातल्या बौधायन धर्म सूत्रात, वेगवेगळ्या प्रदेशांच्या प्रवासाशी संबंधित काही धार्मिक नियमांचे वर्णन करताना सिंधु, सौवीर, सौराष्ट्र, आनर्त, अवंती, विदर्भ, मगध आणि अंग यांचा उल्लेख आहे. बौधायन धर्म सूत्र ह्या प्रदेशांना ‘संकीर्ण योनया’ ह्या नावाने उल्लेखित करते, ह्याचा अर्थ हे प्रदेश आर्यवर्तचे सीमा जनपद आहेत.
वेद केवळ बाह्य सीमा जनपदांचेच वर्णन करत नाहीत तर आर्यवर्तच्या सीमांच्या पलीकडच्या प्रदेशांचे पण वर्णन करतात. बौधायन धर्म सूत्रात, दूरच्या प्रदेशांच्या प्रवासाशी संबंधित धार्मिक नियमांचे वर्णन करताना, आरट्ट , कारशकर, पुंड्र, सौवीर, बंग आणि कलिंग ह्या प्रदेशांचे नाव आढळते. अंतिम चार प्रदेशांच्या नावाचा उल्लेख भारतीय साहित्यात आढळतो परंतु आरट्ट सामान्यपणे ओळखले जात नाही. आरट्ट काय आणि कुठे आहे? आरट्ट आधुनिक इराणचा दक्षिण-पश्चिम भाग आहे, ज्याचा उल्लेख 3,000 ईसा पूर्वच्या सुमेरियन ग्रंथात आढळतो. वेदांमध्ये ह्या प्रदेशाचा जनपद म्हणून उल्लेख आहे. त्याचप्रमाणे, कारशकार, जे बहुतेक आधुनिक काळातील काशगर असणार, ह्याचा पण जनपद म्हणून उल्लेख केला आहे. म्हणून वेद हे आर्यवर्त आणि अक्षरशः आर्यवर्ताच्या सीमेवरील जनपदच नव्हे तर आर्यवर्तच्या सीमेबाहेर अतिदूर असलेल्या बाह्य जनपदांचा देखील उल्लेख करतात.
श्री. मृगेंद्र विनोद,त्यांच्या “आर्यवर्तचे भूगोल (सिंधु-सरस्वती संस्कृती)” या विषयावरील श्रीजन टॉक मध्ये वेदांमधील प्राचीन भारतातील जनपदांच्या संदर्भात उल्लेखित केलेल्या पुराव्यास पुष्टी देतात. ह्या वार्तालापाचा एक अंश येथे सादर केला आहे.
श्री. मृगेंद्र विनोद यांचा संपूर्ण श्रीजन टॉक पाहण्यासाठी खालील दुव्यांवर क्लिक करा:
Part 1 — https://www.youtube.com/watch?v=jfW4iLBgxg8&t=296s
Part 2 – https://www.youtube.com/watch?v=8GA29oqlCko
Part 3 — https://www.youtube.com/watch?v=dqKOtc2gKTs&t=154s