रविवार, ऑक्टोबर 24, 2021
Home > चर्चेच्या झळक्या > औरंगजेब नंतर च्या काळात भारतात ‘पाक भूमी’ (पाकिस्तान) स्थापन करण्याचे प्रयत्न

औरंगजेब नंतर च्या काळात भारतात ‘पाक भूमी’ (पाकिस्तान) स्थापन करण्याचे प्रयत्न

आपली कथा औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतात मराठ्यांच्या विस्ताराने सुरू होते. मराठ्यांनी भारताच्या मोठ्या भागांवर कब्जा करायला सुरवात केली होती आणि मुगल साम्राज्य संकुचित  होत चालले होते. मराठ्यांनी मुघलांना एवढे पराधीन करून ठेवले होते कि मुगल राजा केवळ एक भाडेकरी म्हणून राहिला होता. लाल किल्ल्यावर आता दोन झेंडे फडकत होते, एक मुगलांचा आणि दुसरा शक्तिशाली मराठ्यांचा आणि खरी ताकद मराठ्यांचीच होती. मराठ्यांची पकड इतकी जबरदस्त होती की मुगल राजा मराठ्यांच्या परवानगीशिवाय आणि इशारा शिवाय बोट ही हलवू शकत न्हवता किंवा एक इंच हलू  शकत न्हवता.

ह्याच काळात एक पाक भूमी च्या कल्पनेचा जन्म झाला होता. हा काळ होता प्रसिद्ध मुहम्मद इब्न अब्द अल-वहाब – ज्याने वहाबी विचारधारा म्हणून ओळखली जाणारी चळवळ स्थापन केली –  याचा मित्र शाह वलिउल्लाह याचा. शाह वलिउल्लाह अब्दुल वहाब बरोबर अरब मध्ये शिकत होता आणि त्याचा दृढ विश्वास होता की काफिर लोकं, पाक भूमी असलेल्या मुगल साम्राज्यावर राज्य करू शकत नाही. पाक भूमीवर काफिरांचे शासन आहे हे तो सहन करू शकत न्हवता.

याच काळात ब्रिटीश बंगालकडे वळले होते आणि हैदर अलीने मैसुरु वर विजय मिळविला होता ज्याचा उत्तराधिकारी नंतर त्याचा मुलगा टीपू सुल्तान होता. आता पाक भूमीच्या साठी  काम करणारे दोन होते, उत्तरेस एक आणि भारतच्या दक्षिणेला दुसरे लोक कार्यरत होते. शाह वलिउल्लाह अहमद शाह अब्दाली, रोहिलखंडच्या नजीबुल्लाह आणि अवधच्या असफुद्दाऊला यांच्यात गठबंधन तयार करीत होता ज्याचे रूपांतरण अखेरीस पानिपतच्या युद्धात झाले आणि जे प्रत्यक्षात शाह वलिउल्लाहचेच षड्यंत्र होते. इ.स. १७६१ मध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता पण नंतरचा काळ अति महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक होता. अहमद शाह अब्दाली आपल्या विजयाला एक भक्कम पाया मध्ये परिवर्तित करण्यात असमर्थ ठरला  आणि मराठ्यांनी त्याला इतका त्रास दिला की त्याला शेवटी भारत सोडून जाण्यास भाग पडले आणि त्याच वेळेस तो अफगाणिस्तानातही बंडखोरीला तोंड देत होता.

या भयानक पराजयानंतर सुद्धा मराठ्यांनी आपले स्थान परत मिळविले आणि केवळ भारतावरचे  सार्वभौमत्वच नव्हे तर आपले साम्राज्य कटकपासून ते अटकपर्यंत पसरविले आणि त्यामुळे नेहमीच असे म्हटले गेले की – “मराठा साम्राज्य कटक  से अटक तक फैला हुआ था”. कटक हे सिंधुच्या किनार्यावरील तेच ठिकाण आहे जिथे भारताची पारंपारिक सीमा मानली गेली आहे, त्याहूनही पुढे गांधार होते, जो मौर्य साम्राज्य आणि काही काळ मुगल साम्राज्य वगळता भारत किंवा कोणत्याही भारतीय साम्राज्याचा भाग नव्हता. हे सर्व चालू असताना दक्षिणेत टीपू सुल्तान एक पाक भूमी तयार करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यानी अफगाण राजा आणि अगदी खलीफा यालाही असे लिहिले की त्यानी काफिरांच्या भूमीवर पाक भूमी स्थापन करण्यासाठी त्याला सहाय्य करावे.

पण त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने ही मदत कधीच आली नाही कारण मध्ये शक्तिशाली मराठा साम्राज्य होते. अखेरीस मराठा, निजाम आणि ब्रिटीशांच्या संयुक्त शक्तीने टीपूचा पराभव केला ज्या मुळे  मुगल साम्राज्या नंतर परत एक पाक भूमी स्थापन करण्याचे पहिले स्वप्न संपले.

दुसरा प्रयत्न रायबरेलीच्या सय्यद अहमद बरेलवी याचा होता जो बरेलीहुन न्हवता पण बरेलवी म्हणवला गेला. तो  शाह वलिउल्लाह याचा शिष्य होता आणि त्याचप्रमाणे त्याचा असा विश्वास होता की पंजाबमध्ये एक पाक भूमीची स्थापना करणे आवश्यक आहे कारण तिथे महाराजा रणजीत सिंह यांचे शासन होते आणि पंजाबवर एक काफिर सत्ता गाजवत आहे ह्याचा त्याला भयंकर तिरस्कार होता. म्हणूनच महाराज रणजीत सिंह यांच्या विरोधात जिहाद सुरू करण्यासाठी त्यांनी एक सैन्य गोळा केले आणि पंजाबवर चढाई केली जे १९२० आणि १९३० च्या सुमारास  रजा बरेलेवी याच्यानंतरही फार काळ चालले होते. महाराज रणजीतसिंह यांच्या मृत्यूनंतर सिख साम्राज्याचे पतन झाल्यानंतर एक सर सय्यद अहमद खान यानी पाक भूमी साठी प्रयत्न सुरू केले. त्यानी अलीगढ मध्ये एक मदरसा सुरु केला ज्याला नंतर एंग्लो-ओरिएन्टल कॉलेज असे नाव देण्यात आले आणि जे नंतरच्या काळात अलीगढ मुस्लिम विद्यापीठ बनले. सय्यद अहमद खान यानी अलीगढ एंग्लो-ओरिएंटल महाविद्यालयात औपचारिकपणे प्रस्तावित आणि प्रचारित केलेल्या “द्विराज्यीय सिद्धांत” ला इस्लामिक ग्रंथात मजबूत आधार आहे. म्हणूनच आपण निष्कर्ष काढू शकतो की पाकिस्तान किंवा पाक भूमीची कल्पना इस्लाममध्ये खोल रुतलेली  आहे आणि ज्याची कल्पना १७व्य शतकातच पेरली गेली होती.

मराठी भाषांतरण – अभिजीत अधिकारी

Leave a Reply

Sarayu trust is now on Telegram.
#SangamTalks Updates, Videos and more.

Powered by
%d bloggers like this: