त्यांच्या “#सृजन व्याख्यान” मालिकेच्या ‘भारत एक राष्ट्र’ व्याख्यानामध्ये, संक्रांत सानू यांनी स्थानिक समुदाय आणि जमातींना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती रणनीतींबद्दल भाष्य केले. ख्रिस्ती मिशनरींच्या मुख्य युक्तिवादांपैकी एक असे आहे की हिंदूंनी जातिव्यवस्थेद्वारे आदिवासी समुदायांचे शोषण केलेले आहे आणि त्या पकडीतून बाहेर निघण्यासाठी आदिवासी समुदायांना संपूर्ण ख्रिस्ती धर्म स्वीकारले पाहिजे. पण संक्रांत सानू तथ्यांचा वापर करून ख्रिस्ती युक्तिवादाचा पोकळपणा दाखवतात.
धर्मांतरणाच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराच्या वेळी ख्रिस्ती मिशनऱ्यांचा जगभरातील विविध जनजातींकडून तीव्र विरोध झाला होता. ह्या जनजातींना केवळ त्यांच्या स्वतःच्या धर्मात आणि रूढींमध्ये राहण्याची इच्छा होती आणि त्यापलीकडे स्वर्गीय आनंद प्राप्त करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणून ख्रिस्ती धर्मात जाण्यात काही स्वारस्य न्हवतं. त्यांच्या मते जीवनात त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांची स्वतःची श्रद्धा पुरेशी होती. ह्या जनजातींचा प्रतिकार पाहून, जेव्हा शक्य असेल तेव्हा ख्रिस्ती धर्मानी युरोपमध्ये सर्वत्र दडपशाही आणि जनजातींचा समूळ विनाश सुरु केला. आता युरोपमध्ये कुठेही आदिवासी समुदाय किंवा त्यांच्या श्रद्धा उरलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या आदिवासींच्या बाबतीतही हे प्रकरण तसेच झाले होते. आता ऑस्ट्रेलियातील आदिवासींचे हक्क जवळजवळ प्राण्यांच्या सारखेच राहिले आहेत. हि त्यांची दयनीय अवस्था त्यांच्या देशात ख्रिस्ती धर्माचे आगमन झाल्यामुळे झालेली आहे.
अशा प्रकारे सक्रांत सानूंनी भारतीय हिंदूंना वाचवण्याच्या ख्रिस्ती मिशनरी दाव्याचा ढोंगीपणा दाखवला आहे.
(भाषांतरण – अभिजीत अधिकारी)