शनिवार, ऑक्टोबर 19, 2019
Home > चर्चेच्या झळक्या > शैव आगम कसे प्रकट झाले?

शैव आगम कसे प्रकट झाले?

शैव आगम हे महादेवाने स्वत: प्रकट केलेले आगम आहेत. त्यापैकी कामिक आगम हे सर्वात महत्वाचे आगम असून, त्यात सर्व आगम कसे प्रकट केले गेले त्याचे वर्णन आहे. त्यात महादेवाचे पाच मुख असल्याचे वर्णन आहे – सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि इशान. महादेवाच्या ह्या प्रत्येक मुखाला पाच स्रोत आहेत – लौकिक, वैदिक, आध्यात्मिक, अतिमार्ग, आणि मंत्र. ह्या प्रत्येक स्तोत्राने एक एक आगम प्रकट केले आहे. हि फक्त नावे नसून आगमाच्या कोटी आहे. त्यानुसार आगमाचे २५ मुख आहेत.

सद्योजत मुखाने २४ विविधतेचे भूत तंत्र (उदाहरण – कौल तंत्र) प्रकट केले. वामदेव मुखाने २४ विविधतेचे वाम तंत्र प्रकट केले. अघोर मुखाने भैरव तंत्र प्रकट केले. तत्पुरुष मुखाने २४ विविधतेचे गरुड तंत्र प्रकट केले. इशान मुख, जे सर्वात महत्वाचे स्तोत्र आहे आणि ज्याने ज्ञान आणि कैवल्याची प्राप्ती होते, त्याने दोन प्रकारचे आगम – रुद्र भेद आणि शिव भेद प्रकट केले. रुद्र भेद १८ आहेत आणि शिव भेद १० आहेत. शिव भेदांची नावे – योग, चिंत्य, कारण, अजित, सुदीप्तक, सूक्ष्म, सहस्र, अंशुमान आणि कामिक ह्या रूपात उल्लेखली जातात. यापैकी कामिक हा सर्वात महत्वाचा मानला जातो. कामिक आगम एकूण आगमांची संख्या २५ सांगतो, परंतु इतर मुखांनी प्रकट केलेले आणखी पण आगम आहेत.

ह्यावरून आपल्याला आगमाची विशालता, विविधता आणि गहनता समजण्यास मदत मिळते.

(भाषांतरण – अभिजीत अधिकारी)

Leave a Reply

%d bloggers like this: