Source: –
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य नाही"
– कृष्णाजी अनंत सभासद
महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी #शिवराज्याभिषेक करण्यास नकार दिला/विरोध केला हे धादांत असत्य. कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.
उलटपक्षी; १/क्ष pic.twitter.com/UTqCRjy9Ft
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
३५० वर्षे एकही हिंदू राजा न झाल्याने समग्र राज्याभिषेक विधी येथील ब्राह्मणांना ज्ञात नसल्याने तसेच समर्थ रामदास स्वामींनी गागाभट्ट यांचे नाव सुचवल्याने त्यांना #शिवराज्याभिषेक_सोहळा पार पाडण्यास पाचारण करण्यात आले.
(संदर्भ: भट्टवंश) pic.twitter.com/PGLPPlzRWd
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे कशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे.
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
रामशास्त्रीचे ज्येष्ठ पुत्र नारायणभट्ट यांनी काशीतील मुघल आक्रमकांकडून उद्ध्वस्त केले गेलेले विश्वनाथाचे मंदिर हे स्वखर्चाने पुनर्स्थापित केले!! या नारायणभट्टांचे ज्येष्ठ पुत्र रामकृष्णभट्ट आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे गागाभट्ट अशी ही विद्वानांची वंशावळ.
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
मीमांसाकुसुमांजली, भट्टचिंतामणी, राकागम, सुज्ञानदुर्गोदय इ. अनेक ग्रंथांची निर्मिती गागाभट्टांनी केली. गागाभट्टांनी काशी येथील विद्वानांचा रोष पत्करून ब्राह्मणेतर हिंदूंसाठी वेद्पाठशाळा सुरु करण्याचे क्रांतिकारी पाउल उचलले. हे शास्त्रसंमत असल्याचे 'समयनय' ग्रंथ रचून सांगितले.
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
गागाभट्टांनी 'राज्याभिषेकप्रयोग' नामक विशेष ग्रंथाची रचना रायगडावरच करून त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने महाराजांवर उपनयनसंस्कार करून व त्यांचे सर्व पूर्वविवाह पुन्हा एकवार करवून मग समंत्रक राज्याभिषेक केला आणि शिवराय 'सिंहासनाधीश्वर' झाले!!
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
'कायास्थाचार दीपिका' हा ग्रंथ रचणाऱ्या गागाभट्टांनी बाळाजी आवजी चिटणीसांच्या बंधूंच्या नातवाच्या उपनयनसंस्काराबाबत पुढाकार घेऊन कायस्थांनादेखील उपनयनाचा अधिकार त्यांनी लक्षात आणून दिले. छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मशास्त्राचा अभ्यास दांडगा असल्याचे त्यांनी समयनयमध्ये लिहिले आहे.
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
गागाभट्टांनी दक्षिणा घेतली जरूर; मात्र पुढील काही महिन्यातच त्यांनी संन्यासश्रम स्वीकारला आणि मिळालेल्या दक्षिणेचा विनियोग आपल्या ब्राह्मणेतर हिंदूंसाठी सुरू करण्यात आलेल्या वेदपाठशाळेसाठी केला असा उल्लेख भट्टवंश आणि पाठशाळेतील दस्तांत सापडतो.
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019
इतिहास हा समकालीन पुराव्यांच्या आधारे लिहिला/ सांगितला जावा. आंधळ्या जातीद्वेषापोटी असत्यकथन करून समाजाची सर्वकाळ दिशाभूल करता येत नसते!
— Dr. Pareexit Shevde (@DrPareexitS) June 15, 2019