शनिवार, ऑक्टोबर 19, 2019
Home > ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि हिंदूंचे संरक्षण > इंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण

इंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण

तर अशा तऱ्हेने अफ़्रिकेचे वाटे करण्यात आले. दक्षिण आणि मध्य अमेरिका. आपण काही अगदीच प्रत्येक देशाचा आढावा नाही घेत आहोत, पण ह्याची कहाणी मात्र रोचक आहे. १४९३ साली एक ‘इंटर सेटेरा’ नामक ‘पेपल बुल’ अर्थात पोपचा हुक़ूमनामा काढण्यात आले. ह्याद्वारे ‘डॉक्ट्रिन ऑफ़ डिसकवरी’ मांडण्यात आली. इथे ‘डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी’ किती जणांना माहित आहे ? अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे ते. इतकं की अमेरिकी खंडांच्या, किंबहुना जागतिक वसाहतीकरणाच्या मुळाशी हेच कारण आहे. तर काय म्हणतो हा पोपचा जाहीरनामा ? खरंतर हा जाहीरनामा केवळ स्थानिक राजकारणाशी संबंधित होता पण त्यात एका ख्रिस्ती उपदेशाचा फतवा होता की पृथ्वी ही ख्रिस्ती ईश्वराची मालमत्ता आहे आणि गैरख्रिस्ती हे अनधीकृत अधिवासी आहेत. त्यांना एकतर धर्मांतरित करा किंवा त्यांना मारून टाका. हे दोनच पर्याय.
जेव्हा स्पॅनिश तिथे आले, त्यांनी हा हुक़ूमनामा दाखवत त्या संपूर्ण भूमीवर आपला हक्क सांगितला.  ते मूळ निवासी असला कागद बघून बुचकळ्यातच पडले. कशाशी खातात हा कागद? कोण तुम्ही? स्पॅनिशांनी उलट त्यांनाच प्रतिप्रश्न करत ‘तुमचा कागद कुठे आहे?’ असे विचारले. मूळ निवासी म्हणाले, “आपल्या सगळ्यांच्याच मृत्यूनंतरही ही भूमी अस्तित्वात असतेच, तेव्हा तुम्ही तिच्यावर हक्क कसा काय सांगू शकता?”
पण ख्रिस्ती धर्मोपदेशानुसार हत्याकांड समर्थनीय आहे. सामान्य स्पॅनिश माणूस अशा कत्तली आणि नरसंहार करायला कसा काय उद्युक्त झाला? अमेरीकी मूळनिवाश्यांच्या अनेक पिढ्यांत १० करोडच्या घरात एवढा नरसंहार घडवून आणण्यात आला. कुठल्याही कृत्याला ईश्वराचा शिक्का लावला म्हणजे झाले. हे देवकार्य आहे आणि त्यामुळे ते स्तुत्यच आहे. समोरची लोकं सैतानाची लेकरं असल्यामुळे एकतर त्यांना मारून टाकण्यात यावे किंवा त्यांना बाटवावे. दोनही मार्गांनी तुम्ही ईश्वराचेच कार्य करताय – ही त्या मागची पार्श्वभूमी झाली. तर त्यांनी अक्षरशः जगावर एक काल्पनिक रेषा आखली. स्पॅनिश राजाने स्पॅनिशांना हे प्रांत वसवायला नेमून दिले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात, एतद्देशीयांची भूमी बळकावण्यास्तव आणि त्याच मूळनिवाश्यांनी आपल्या भूमीवर अधिकार सांगू नये म्हणून ह्या ‘डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी’ चा दाखला दिला गेलाय. अशा तऱ्हेने त्या जाहीरनाम्याला संविधानिक आधार मिळाला. पोर्तुगल हा ही एक ख्रिस्ती देशच होता. तर मग त्या रेषेच्या डाव्याबाजूचं जग स्पेनला सोपवण्यात आलं तर उजव्या बाजूचं जग हे पोर्तुगलला. ह्यामुळेच स्पेन भारताकडे फिरकला नाही पण पोर्तुगल मात्र भारतापर्यंत पोचू शकला. स्पेन ने ब्राझील सोडता बहुतांशी अमेरिकी खंड आपल्या ताब्यात घेतला. त्या रेषेनुसार बहुतांशी ब्राझील पोर्तुगालच्या अधिपत्याखाली येत होता. म्हणून उर्वरित दक्षिण अमेरिकी खंड स्पॅनिश बोलत असताना केवळ ब्राझील पोर्चुगीझ बोलतो. तर असा होता त्यांचा वसाहतवाद.

Leave a Reply

%d bloggers like this: