आपली कथा औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतात मराठ्यांच्या विस्ताराने सुरू होते. मराठ्यांनी भारताच्या मोठ्या भागांवर कब्जा करायला सुरवात केली होती आणि मुगल साम्राज्य संकुचित होत चालले होते. मराठ्यांनी मुघलांना एवढे पराधीन करून ठेवले होते कि मुगल राजा केवळ एक भाडेकरी म्हणून राहिला होता. लाल किल्ल्यावर आता दोन झेंडे फडकत होते, एक मुगलांचा आणि दुसरा शक्तिशाली मराठ्यांचा आणि खरी ताकद मराठ्यांचीच होती. मराठ्यांची पकड इतकी जबरदस्त होती की मुगल राजा मराठ्यांच्या परवानगीशिवाय आणि इशारा शिवाय बोट ही हलवू शकत न्हवता किंवा एक इंच हलू शकत न्हवता.
ह्याच काळात एक पाक भूमी च्या कल्पनेचा जन्म झाला होता. हा काळ होता प्रसिद्ध मुहम्मद इब्न अब्द अल-वहाब – ज्याने वहाबी विचारधारा म्हणून ओळखली जाणारी चळवळ स्थापन केली – याचा मित्र शाह वलिउल्लाह याचा. शाह वलिउल्लाह अब्दुल वहाब बरोबर अरब मध्ये शिकत होता आणि त्याचा दृढ विश्वास होता की काफिर लोकं, पाक भूमी असलेल्या मुगल साम्राज्यावर राज्य करू शकत नाही. पाक भूमीवर काफिरांचे…
भारतीय लोकांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे की, जनपद केवळ बौद्ध काळातच अस्तित्त्वात होते, वैदिक कालखंडात नव्हे, कारण वेदांमध्ये त्यांचा संदर्भ दिसत नाही. वेदांमध्येच नमूद केलेल्या अंतर्गत पुराव्याला सादर करून श्री. मृगेंद्र विनोद हे, हा गैरसमज दूर करतात
श्री. मृगेंद्र यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या शतापथ ब्राह्मणांतील अनेक संदर्भ उद्धृत केले आहेत, ज्यात त्यांनी वैदिक काळातील अनेक साम्राज्य आणि जनपदांची नावे दाखवलेली आहेत. कुरुक्षेत्राला केंद्र ठेवून, पूर्व दिशेला कुरु आणि पांचाळ आहे. गंगा आणि यमुना दरम्यानच्या प्रदेशात कुरु आणि पूर्वेला गंगेच्या पलीकडे पांचाळ आहे. उत्तरेकडे श्रीन्जय आणि दक्षिणेला मत्स्य आहे. गांधार, कैकय आणि माद्र हे उत्तर जनपद आहेत, तर कोशल, विदेह आणि काशी पूर्वी जनपद आहेत.
कृष्ण यजुर्वेदातल्या बौधायन धर्म सूत्रात, वेगवेगळ्या प्रदेशांच्या प्रवासाशी संबंधित काही धार्मिक नियमांचे वर्णन करताना सिंधु, सौवीर, सौराष्ट्र, आनर्त, अवंती, विदर्भ, मगध आणि अंग यांचा उल्लेख आहे. बौधायन धर्म सूत्र ह्या प्रदेशांना ‘संकीर्ण योनया’ ह्या नावाने उल्लेखित करते, ह्याचा अर्थ हे प्रदेश आर्यवर्तचे…
अयोध्या राम मंदिर प्रकरणावरील वार्तालाप आणि मुलाखतींच्या मालिकेची सुरुवात म्हणून, सृजन फाउंडेशनने नवी दिल्लीतील INTACH येथे डॉ. मीनाक्षी जैन यांचे “अयोध्या येथे राम मंदिरासाठी वाद” नावाच्या सृजन वार्तालापाचे आयोजन केले.
आदरणीय वक्त्या, मीनाक्षी जैन दिल्ली विद्यापीठातील पीएचडी आहेत आणि त्यांचा भारतीय संस्कृतीत गाढा व्यासंग आहेत. सध्या त्या भारतीय ऐतिहासिक परिषदेच्या (ICHR ) सदस्य आहेत.
खाली डॉ. जैनच्या सृजन वार्तालापाचा एक अंश दिलेला आहे, ज्यात अयोध्या येथील राम जन्मभूमि-बाबरी मस्जिद ची समस्या जळत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेल्या असत्यांचे तपशील दिले आहे.
नोव्हेंबर १९८९ मध्ये वामपंथी इतिहासकारांनी अयोध्येच्या वादविवादात सामील झाल्यापासून ह्या प्रकरणाबद्दल असत्य पसरवून देशाला फसवत आहेत आणि राम जन्मभूमी-बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात अडथळा आणत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिग्दर्शित केल्याप्रमाणे उत्खनन केले असले तरीही या वामपंथी इतिहासकारांनी एएसआय च्या कामाला न्यायालयात आणि बाहेर दोन्ही जागेत अविश्वासार्ह ठरवण्यासाठी एक सुसंगत मोहिम काढून प्रतिसाद दिला. न्यायालयात ह्या लोकांनी…
बाबर मस्जिदच्या खाली असलेल्या एका प्राचीन मंदिराच्या उपस्थितीबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि विद्वानांनी पुरविलेले बरेच पुरावे असूनही, वामपंथी इतिहासकारांनी त्या पुराव्यांच्या अस्तित्वालाच स्वीकारण्यास नकार दिला होता. ह्या विवादाचा निराकरण होत नसल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शेवटी बाबरी मशिदीच्या खाली एक मंदिर आहे का हे पाहण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला उत्खनन करायला सांगितले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एएसआय ला कडक निर्देश दिले होते कि बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी आणि राम जनमभूमी संघटनेतील प्रत्येक प्रतिनिधीने दररोज उत्खनन स्थळावर उपस्थित असणे आवश्यक आहे आणि जे काही निष्कर्ष तयार होतील ते एका रजिस्टरमध्ये योग्यरित्या नोंदले पाहिजे ज्यावर दररोज दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केली पाहिजे.
एएसआयने अलाहाबाद उच्च न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांनुसार उत्खनन पूर्ण केले. एएसआय उत्खननांच्या निष्कर्षांनी दिसून आले की ई.पू. दोन सहस्त्र वर्षा पासून राम जन्मभूमिवर सतत वास्तव्य असून हे स्थान नेहमीच एक पवित्र स्थळ होते आणि कधीच राहणी साठी वापरले जात नव्हते.
ई.पू. पहिल्या सहस्राब्द पासून, २ ते १ शताब्दी ई.पू. शुंग कालखंड,…